25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाधर्म बदलून निकाह कर...नाहीतर तुझीही निकिता तोमर करू.

धर्म बदलून निकाह कर…नाहीतर तुझीही निकिता तोमर करू.

Google News Follow

Related

निकिता तोमर या तरुणीच्या हत्येने हरियाणा राज्य हादरून गेले होते. काही दिवसांपूर्वीच तिच्या मारेकऱ्यांवरचे आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे सगळे तपशील ताजे असतानाच हरियाणामध्ये आणखीन एक निकिता तोमर होण्यापासून वाचली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे धार्मिक कट्टरतेचा बळी ठरण्यापासून हरियाणातील एका अल्पवयीन मुलगी बचावली आहे.

२ एप्रिल रोजी हरियाणातील तौर भागातील एक अल्पवयीन मुलगी शिकवणीसाठी जात होती. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास विजय चौक परिसरात विशिष्ट धर्माच्या दोन धर्मांध तरुणांनी या मुलीची वाट अडवली. त्या दोघांपैकी एकाने त्या अल्पवयीन मुलीकडे थेट निकाह करण्याची मागणी केली. तुझा धर्म बदलून माझ्याशी निकाह कर अन्यथा तुझीही निकिता तोमर करू अशी धमकी त्या मुलीला देण्यात आली. त्या मुलीला काही कळायच्या आत तिच्या अंगावर हात टाकण्यात आला. तिला दुचाकीवर बसवून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा त्या दोघांना हे शक्य झाले नाही तेव्हा त्यांनी आपल्या इतर सहा-सात साथीदारांना मदतीसाठी बोलावले. पण तितक्यातच त्या मुलीने निडरपणे दुचाकीवरून खाली उडी मारली. तेवढ्या वेळात त्या मुलीचा आक्रोश ऐकून रस्त्यावरचे नागरिक त्या मुलीच्या मदतीला देवासारखे धावून आले. मुलीच्या मदतीला आलेल्या लोकांना पाहून त्या तरुणांनी तिथून पळ काढायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात काही तरुण यशस्वी झाले असले तरीही लोकांनी तीन तरुणांच्या मुसक्या आवळून त्यांना पोलीसांच्या हवाली दिले. हमजा, परवेज आणि शाहिद अशी या तीन तरुणांची नावे आहेत. संतप्त नागरिकांनी या तिघांना चांगला चोप दिला आणि पोलीस स्टेशनला हजर केले.

हे ही वाचा:

राज्यात ‘विकेंड’ लॉकडाऊन, काय आहेत नवे नियम?

कोळसा घोटाळ्यात ममतांचे हात काळे

आम्ही जनतेसोबत, पण सरकारच्या उपाययोजनांना आमचा पाठींबा

भाजपा राज्य सरकारला सहकार्य करेल

या घटनेची माहिती मिळताच शहरातील सामाजिक संघटनांचे लोक पोलीस स्टेशनला येऊन पोहोचले. नागरिकांचा वाढता दबाव लक्षात बघून पोलीसांनी जलद गतीने या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला आहे. शनिवारी या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजार करण्यात आले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर पोलीस इतर सात तरुणांचा तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा