मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील १४ ते २५ वयोगटातील अपहरण झालेल्या आणि हरवलेल्या महिलांची संख्या १ जानेवारी २०२२ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत ३२३७ अशी आहे.
शासकीय माहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्तांनी ही माहिती उपलब्ध केली आहे. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती हृषिकेश तिवारी यांनी मागविली होती. १० ऑगस्टला तिवारी यांनी हा अर्ज ऑनलाइन केला होता. त्याला ८ सप्टेंबर रोजी हे उत्तर आयुक्तांनी दिले आहे.
हे ही वाचा:
बापरे! महिलेच्या पोटातून निघाला २ किलोचा ‘केसांचा गोळा’
भोपाळमधून १,८०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक!
‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’च्या संकल्पनासाठी राज्यात ‘सजग रहो’ अभियान!
त्यांनी माहिती मागविली होती की, १ जानेवारी २०२२ ते २०२४पर्यंत १४ ते ३५ वयोगटातील बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या किती? यासंदर्भात पोलिसांनी कोणत्या प्रकारची चौकशी आणि कारवाई केली, याचीही माहिती तिवारी यांनी मागविली होती. त्याबाबत आयुक्तांनी म्हटले आहे की, प्रत्येक पोलिस ठाण्यात जनमाहिती अधिकारी यांच्याकडून ही माहिती प्राप्त करून घेण्यास सांगितले आहे.