पुणे कस्टम विभागाने मोठी कारवाई करत हिरे जप्त केले आहेत. पुणे विमानतळावर कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने ७५ कॅरेट वजनाचे सुमारे ३ हजार हिरे यावेळी जप्त केले आहेत. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी एकाला अटक केली आहे.
पुणे कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला १७ मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली होती. माहितीनुसार, शारजाहून येणाऱ्या एका विमानात हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची खबर होती. मिळालेल्या माहितीनुसार पुणे कस्टम विभागाने संशयित एका प्रवाशाला अडवत त्याची चौकशी केली, प्रवाशाची पूर्ण तपासणी केली असता त्याच्याकडे सुमारे ३ हजार हिरे सापडले.
हे ही वाचा:
इम्रान खान का आहेत मोदींच्या प्रेमात?
बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम
शिवसेना, जनाब सेना आणि रा.स्व. संघ…
पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक
पुणे कस्टम विभागाला या संपूर्ण कारवाईमधून एकूण ७५ कॅरेट वजनाचे सुमारे ३ हजार हिरे आढळून आले आहेत. या हिऱ्यांची किंमत एकूण ४८.६६ लाख इतकी आहे. हे हिरे संबधित प्रवाशाच्या सामानात असलेल्या ट्राउझर्सच्या पाऊचमध्ये लपवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सामनाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांना हे हिरे आढळून आले. त्यानंतर या प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.