उरीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; मृतदेह ताब्यात घेत असताना पाकिस्तान लष्कराकडून गोळीबार

दहशतवादी पाक व्याप्त जम्मूतील नियंत्रण रेषेतून जम्मू-काश्मिरमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते

उरीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; मृतदेह ताब्यात घेत असताना पाकिस्तान लष्कराकडून गोळीबार

भारतीय लष्कराने जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत शनिवार, १६ सप्टेंबर रोजी तीन दहशतवाद्यांना मारण्यात यश आले आहे. तीन दहशतवादी पाक व्याप्त जम्मूतील नियंत्रण रेषेतून जम्मू-काश्मिरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी भारतीय जवानांनी त्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

 

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, “दोन दहशतवाद्यांचे मृतदेह मिळवण्यात यश आले असून तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेत असताना पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. त्यामुळे तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात अडथळा येत आहे.” ‘एक्स’वर यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

जम्मूच्या उरी भागात लष्कराची कारवाई सुरु आहे. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा दल आणि काश्मिर पोलिस यांच्याकडून संयुक्त मोहीम सुरू आहे. मात्र, यामध्ये पाकिस्तानच्या लष्काराकडून अडथळा निर्माण करत असल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी बारामुल्लातील उरी सेक्टरमध्ये तीन दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय लष्कराने त्यांना ठार केले.

हे ही वाचा:

भारत-कॅनडामधील संबंध ताणले

उत्तर प्रदेशातले गोई हे वटवाघळांचे गाव

सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, सेंड अँड्र्यूज कॉलेजला जेतेपद

के. सी. कॉलेज खेलो इंडिया बास्केटबॉल स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये

लष्कराकडून सध्या मोहीम सुरू असून या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु झाला. यापूर्वी झालेल्या एका हल्ल्यात भारतीय लष्कराच्या चार अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने कारवाई कठोर सुरू केली आहे. भारतीय लष्कराकडून अजूनही शोध मोहीम सुरु आहे.

Exit mobile version