जम्मू काश्मीरमधील दोन चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

जम्मू काश्मीरमधील दोन चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतीय लष्कराच्या जवानांना तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तिघांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवर लष्कराकडून केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

कुपवाडा जिल्ह्यातील खराब हवामानाचा फायदा घेत दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जात होता. जवानांना हालचाल जाणवताच त्यांचा प्रयत्न जवानांनी उधळवून लावला. यावेळी झालेल्या गोळीबारादरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. माछिलमध्ये दोन आणि तंगधारमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. मध्यरात्री जवानांना दहशतवाद्यांच्या संशयित हालचाली दिसून आल्या. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली. तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला. सध्या तंगधार आणि माछिलमध्ये जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत. या परिसरामध्ये आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

गुजरातमध्ये पावसाचा हाहाःकार; पूरग्रस्त भागातून १७,८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

बंगळुरू विमानतळावर तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

आर.जी. कर दुष्कृत्य प्रकरण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया !

सोनिया-राजीव विवाह हे आयएसआयचे षडयंत्र? आरोपांपेक्षा काँग्रेसचे मौन अधिक गूढ

दरम्यान, राजौरीमध्येही लष्कराकडून शोध मोहीम सुरू आहे. या ठिकाणी दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. बुधवारी राजौरीमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. दहशतवादी एलओसीवरून तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरी करू शकतात अशी माहिती जवानांना मिळाली होती. त्यामुळे एलओसीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सगळीकडे पोलिस आणि लष्कराच्या जवानांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Exit mobile version