अनंतनाग येथे तीन दहशवाद्यांचा खात्मा

अनंतनाग येथे तीन दहशवाद्यांचा खात्मा

Photo Credit ANI

जम्मू आणि काश्मिरच्या अनंतनाग भागातील वैलू, कोकरनाग येथे सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशकतवाद्यांत १ एप्रिल रोजी भाजपा आमदाराच्या घरावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा देखील समावेश होता.

सुरक्षा दलांच्या आणि लष्कर-ए- तोयबामधील आतंकवाद्यांमधील चकमकीला आज सकाळी सुरूवात झाली. अनंतनाग भागातील वैलू, कोकरनाग येथे लष्कर-ए-तोयबाच्या तीन आतंकवाद्यांना घेरण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. त्यानंतर त्यांच्यात बरीच मोठी चकमक उडाली होती.

हे ही वाचा:

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

माजी खासदार पप्पू यादव यांना अटक

ठाकरे सरकारने अर्णब, कंगनाशी लढण्यात घालवली दीड वर्ष

तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा

या चकमकीनंतर काश्मिरचे आयजीपी विजय कुमार यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार घेरण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीनही आतंकवाद्यांना ठार मारण्यात पोलिस दलाला यश आले आहे. या मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांत उबैद शफी हा देखील सामिल होता. या शफीचा अरी बाघ येथे भाजपा आमदाराच्या घरावर १ एप्रिलल्या झालेल्या हल्ल्यात हात होता. त्या हल्ल्यात जम्मू आणि काश्मिर पोलिस दलातील रमीझ राजा हुतात्मा झाले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.

Exit mobile version