बालासोर रेल्वे अपघातासाठी ३ रेल्वे अधिकारी जबाबदार

सीबीआयने लावला सदोष मनुष्यवधाचा आरोप

बालासोर रेल्वे अपघातासाठी ३ रेल्वे अधिकारी जबाबदार

ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रात ३ रेल्वे अधिकाऱ्यांची नावे आहेत. यात वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभागीय अभियंता मोहम्मद आमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांचा समावेश आहे. या तिघांना ७ जुलै रोजी अटक करण्यात आली. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधासह पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

ओडिशाच्या बालासोर येथे २ जून २०२३ रोजी संध्याकाळी चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस मुख्य मार्गाऐवजी मालगाडी उभी असलेल्या लूप लाइनमध्ये घुसली. रेल्वे मालगाडीला धडकली. कोरोमंडल आणि मालगाडीच्या काही बोगी लगतच्या रुळावर विखुरल्या. त्यानंतर काही वेळातच हावडा-बेंगळुरू एक्स्प्रेस रुळावर विखुरलेल्या डब्यांना धडकली. सरकारी आकडेवारीनुसार या अपघातात २९५ लोकांचा मृत्यू झाला असून १२०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

 

यात सीबीआयने मोहंती, आमीर खान आणि पप्पूकुमार या तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर आरोप करत त्यांना अटक केली. या तिघांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सीबीआयने जुलैमध्ये सांगितले होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते हे तिन्ही आरोपींना माहिती होते, असा दावाही तपास यंत्रणेने केला होता.

हे ही वाचा:

क्रिकेटचाहत्यांच्या इच्छांवर फेरले गेले पावसाचे पाणी, भारत-पाक सामना रद्द

एक देश, एक निवडणूक समितीत अमित शहा, अधीर रंजन चौधरी

जालना आंदोलनातून महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचा प्रयत्न

ऑगस्टमध्ये जीएसटी जमा होण्याचा नवा विक्रम

या अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएस) जुलैच्या पहिल्या आठवड्यात या अपघातासाठी सिग्नलिंग विभागातील कर्मचाऱ्यांच्या मानवी चुकांना जबाबदार धरले होते.सीबीआयने २४ ऑगस्ट रोजी भुवनेश्वरच्या विशेष न्यायालयात अहवाल सादर केला. त्यात तपास यंत्रणेने सांगितले की, मंजुरीविना ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रेल्वे अपघात झाला. यापूर्वी बहनगा बाजार स्थानकाच्या लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ९४ येथे मंजुरीविना दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.

सीबीआयने सांगितले की, तेथे दुरुस्तीचे काम वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता यांच्या मंजुरीशिवाय करण्यात आले. त्यासाठी सर्किट डायग्रामही पास झाला नाही. सीबीआयशिवाय रेल्वे बोर्डाच्या वतीने रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांनीही अपघाताचा तपास केला आहे. ३ जुलै रोजी, CRS ने बोर्डाला ४० पानांचा अहवाल सादर केला. त्यानुसार, लेव्हल-क्रॉसिंग लोकेशन बॉक्सच्या आतील तारांच्या चुकीच्या लेबलिंगमुळे स्वयंचलित सिग्नलिंग सिस्टममध्ये बिघाड झाला, त्यामुळे हा अपघात झाला, असे सांगण्यात आले.

Exit mobile version