साऱ्या देशभर जेव्हा एकीकडे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र तीन ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. सकाळी मंत्रायल आवारात आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला. तर त्यानंतर एका मागो माग एक असे धुळे आणि तुळजापूर या दोन ठिकाणी अशाच प्रकारचे आत्मदहनाचे प्रयत्न झाल्याचे वृत्त आले.
आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात ध्वजारोहण करून भाषण करत होते. त्याचवेळी मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा शेतकरी जळगाव जिल्ह्यातील होता. पण मंत्रालय आवारात सुरक्षेच्या कारणास्तव तैनात असेलेले मरिन लाईन्स पोलीस आणि मंत्रालय पोलीस यांनी प्रसंगावधान दाखवत अनर्थ टळला.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाला कोरोनाची लागण
दक्खनच्या राणीला विस्टाडोमचा मुकुट
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ
तर नंतर धुळ्यातील घटना समोर आली. धुळ्यातील एका मेंढपाळाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शेतीचे झालेले प्रचंड नुकसान आणि न मिळणारी नुकसान भरपाई या साऱ्यामुळे पिचलेल्या मेंढपाळाने आत्मदहनाचाही प्रयत्न केल्याचे समजते. तर तुळजापूरमध्येही अशाच प्रकारे आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुळजापूरमध्ये काही महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पण या दोन्ही ठिकाणी उपस्थित पोलीसांनी सावधानता दाखवत कुठलाही गैर प्रकार होण्यापासून टाळला.
या सर्व घटनांवरून भारतीय जनता पार्टीने सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून भाजपा महाराष्ट्राने ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ‘ठाकरे सरकारला थोडी जरी शरम शिल्लक असेल तर त्यांनी या नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत.’ असा घणाघात भाजपाने केला आहे.
अमृत महोत्सव की हिरक महोत्सव हा मुख्यमंत्र्यांचा गोंधळ दूर झाला असेल तर जरा राज्यात काय चाललंय याकडे लक्ष द्यावे
स्वातंत्र्यदिनी राज्यात तीन ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.या ठाकरे सरकारला थोडी जरी शरम शिल्लक असेल तर त्यांनी या नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत. pic.twitter.com/Uy5CpZ1ZZX— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 15, 2021