उस्मानाबाद येथे घरात घुसून दोन महिलांसह तिघांना मारहाण

उस्मानाबाद येथे घरात घुसून दोन महिलांसह तिघांना मारहाण

महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाला त्यांच्याच भावकीतील लोकांनी घरगुती कारणावरून घरात घुसून मारहाण केली आहे. कांता सोनवणे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

उस्मानाबादमधील तुळजापूर, आपसिंगा येथे कांता सोनवणे आणि त्यांचे पती मारुती सोनवणे यांना मारहाण करण्यात आली आहे. कांता मारुती सोनवणे (५५) यांनी घडलेल्या प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात हजर राहून कांता यांनी जबाब दिला आहे. कांता या कुटुंबासोबत आपसिंगा येथे राहत असून, मोलमजुरी करून त्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. त्यांच्या जबाबानुसार, २५ सेप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजता कांता यांचे पती मारुती सोनवणे, सून रेश्मा सोनवणे हे घरामध्ये होते. त्यावेळी कांता यांची सून त्यांच्या घरासमोर दारामध्ये भांडी घासत होती. रेश्मा सोनवणे घराबाहेर भांडी घासत असताना चंद्रशेखर सोनवणे व्हिडिओ काढत होते. त्यांना याबद्दल जाब विचारल्यावर त्यांनी शिवीगाळ केली. त्याची तक्रार तुळजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. तक्रार करून घरी आल्यावर चंद्रशेखर सोनवणे, महेंद्र सोनवणे, शैलेंद्र सोनवणे, महादेव सोनवणे, सविताबाई सोनवणे यांनी घरात शिरून रेश्मा सोनवणे, कांता सोनवणे, मारुती सोनवणे यांना बेदम मारहाण केली आणि घरात तोडफोड केली.

या मारहाणीत कांता यांच्या पतीला मुकामार लागला. चंद्रशेखर सोनवणे याने कांता यांची छेडछाड काढून मारहाण केली त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. कांता बेशुद्ध पडल्या त्यानंतर त्यांना आणि मारुती सोनवणे याना त्यांच्या मुलांनी प्रथम तुळजापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नंतर उस्मानाबाद येथे आणि मग सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले. सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती शंकर सोनवणे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

मुस्लिम तरुण नाव बदलून गरब्यात घुसले, तिघांना अटक

टेकूच्या शोधात शिल्लक सेना…

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

पाच दिवसांनी म्हणजेच शुक्रवार, ३० सेप्टेंबर रोजी त्यांना घरी पाठवले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारबद्दल तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंडसंहिता १८६० नुसार कलम १४३, १४७, १४८, ३२३, ५०४, ४५२, ३५४ दाखल केले आहेत.

Exit mobile version