जम्मू आणि काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या आणि काही घुसखोरांच्यात चकमक झडली. या चकमकीत तीन घुसखोर मारले गेले, तर एकाने आत्मसमर्पण केले. अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुरक्षा दलाने यानंतर दक्षिण काश्मिर जिल्ह्याच्या काणिगाम भागात शोध मोहिम जारी केली आहे. या भागात काही घुसखोर लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दुसऱ्या रात्रीपासून ही मोहिम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
हे ही वाचा:
काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नव्हते
भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून आघाडी सरकारने आरक्षण घालवले
ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक
आरक्षणाची जबाबदारी ढकलायला मुख्यमंत्र्यांचा लाईव्हचा खटाटोप
त्यांनी हे देखील सांगितले की, या भागातील काही स्थानिक तरूणांना अल- बद्र या संघटनेने नुकतेच भरती केले होते. त्यांच्याशी सुरक्षा दलांनी प्रचंड संयमाने आणि धीराने वागण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांनी शरण यावे यासाठी देखील कसून प्रयत्न केले. परंतु घुसखोरांनी या सर्व आवाहनांना धुडकावून लावले.
घुसखोरांनी समर्पण करण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर त्यांनी बेछूट गोळीबार करायला सुरूवात केली, त्याशिवाय काही ग्रेनेड देखील सुरक्षा दलाच्या दिशेने फेकले. त्यामुळे सुरक्षा दलाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. परिणामी त्यात काही घुसखोर मरण पावले अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
या चकमकीत एका घुसखोराने सुरक्षा दलांसमोर शरणागती पत्करली, तर इतर तीन मात्र मारले गेले. तौसिफ अहमद असे शरण आलेल्या घुसखोराचे नाव असल्याचे कळले आहे.