जम्मू शहराला लागून असलेल्या सिद्दा भागात बुधवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळी पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे पथक उपस्थित आहे. सध्या संबंधित परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी सिद्दातील पोलीस चौकीवर हल्ला केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सकाळी सिद्धा पुलावर एक ट्रक तपासणीसाठी अडवला. पोलिसांना पाहताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ट्रकमध्ये बसलेल्या इतरांनी गोळीबार सुरू केला. यानंतर चकमक सुरू झाली. तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील सिद्दा बायपास भागातील तवी पुलाजवळ दाट धुक्यात पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांशी चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याने सांगितले की, दहशतवादी ट्रकमध्ये लपून जम्मूहून काश्मीरच्या दिशेने जात होते. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
हे ही वाचा:
भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ
आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?
पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला
सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू
सहा डिसेंबरच्या रात्री उशिरा दहशतवाद्यांनी सिद्दा पुलाजवळील पोलिस चौकीवर ग्रेनेड फेकले होते. पुलावर उपस्थित असलेल्या पोलिसांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. मात्र, हल्लेखोर चुकले आणि ग्रेनेड जवळच्या विद्युत खांबावर आणि झाडाच्या मध्ये पडला. खांबावर छेडछाडीच्या खुणा आढळल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-
काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेत असल्याची माहिती आहे . या बैठकीला जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.