पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. पुलवामामध्ये सुरक्षा दलाला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. हे तीनही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती देत सांगितलं की, “चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी स्थानिक होते. तसेच पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. त्यापैकी एकाचे नाव जुनैद असून त्याने १३ मे रोजी आमचे सहकारी शहीद रियाझ अहमद यांची हत्या केली होती.”

हे ही वाचा:

“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखवली”

नवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

“संजय राऊत ब्रह्मदेव आहेत काय? मतदान दिलं नाही हे कसं कळालं?”

संत तुकारामांच्या अभंगातून संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

इतर दोन दहशतवाद्यांची नावे फाजिल अहमद भट आणि इरफान अहमद मलिक अशी आहेत. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम चकमक सुरू होती त्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर कारवाईला सुरुवात केली. काश्मीरमधील पोलीस, सुरक्षा दलांवर हल्ले आणि इतर हिंसक घटनांमध्ये हे दहशतवादी सहभागी होते, अशी माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारु गोळा जप्त केला आहे. या परिसरात सध्या नाकेबंदी करण्यात आली आहे.

Exit mobile version