मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, तीन मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, तीन मृत्यू

सोमवार, ९ मे रोजी पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला आहे. खोपली एक्झिटजवळ हा अपघात झाला असून, यामुळे मुंबई आणि पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणा-या प्रोपोलिन गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. त्यावेळी खोपोली एक्झिटजवळ हा टँकर उलटला. या टँकरला मागून येणा-या तीन गाड्या धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे. घटनेनंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आदींनी घटनास्थळी धावा घेत मदतकार्य युद्धपातळीवर सुरु केले आहे.

हे ही वाचा:

सोमय्या सहकुटुंब पोलिस ठाण्यात; संजय राऊतांविरोधात तक्रार

मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजा इतके रुपये

NIA कडून डी कंपनीसंबंधित २० ठिकाणी छापे

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

अपघातग्रस्त टॅंकर एका लेनवरून दुसऱ्या लेनवरती आल्यामुळे समोरच्या वाहनांना धडक बसली. त्यामुळे त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, घटनेनंतर खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या अपघातात टँकरचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त दोन गाड्या या क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version