तीन किलो ड्रग्स लेहेंग्यातून चालले होते ऑस्ट्रेलियाला

तीन किलो ड्रग्स लेहेंग्यातून चालले होते ऑस्ट्रेलियाला

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) हैदराबाद झोनने कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ (ड्रग्स) परदेशात पाठवले जात असल्याचे उघडकीस आणले आहे. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स ऑस्ट्रेलियाला पाठवली जात असताना एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या ड्रग्समध्ये स्यूडोफेड्रिन ड्रग्सचा मोठा साठा असल्याची माहिती समोर आली आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन किलो ड्रग्स लेहेंग्यामध्ये लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी सुरू होती. लेहेंग्याच्या फॉलमध्ये हे ड्रग्स लपवून ठेवण्यात आले होते. ड्रग्स पेडलर्स मोठ्या प्रमाणात स्यूडोफेड्रिन ड्रग्स ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी करत आहेत, अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे, जेव्हा एनसीबी च्या टीएसयू बेंगळुरूने चेन्नईतील कन्साइनरची ओळख पटवली तेव्हा त्याच्यामध्ये ड्रग्स आढळून आले. एनसीबी चेन्नई टीमने माल पाठवणाऱ्याचा पत्ता ओळखला आणि २२ ऑक्टोबर रोजी त्याला चेन्नई येथून पकडले.

हे ही वाचा:

‘परमबीर गायब’वर टिप्पणी, पण अनिल देशमुखांबद्दल शब्द नाही

दुबई-जम्मू-काश्मीर करार हे भारतासाठी मोठे यश

अभिनेत्याकडून चुकून गोळी सुटली आणि सिनेमॅटोग्राफरचा घेतला जीव!

‘मुख्यमंत्रीजी औरंगाबाद जिल्ह्यात आहात, तर सामुहिक बलात्कार पीडित परिवाराची भेट घ्या’

तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, हे पार्सल नरसापुरम, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश येथून बुक केले होते आणि ते ऑस्ट्रेलियाला जात होते. ड्रग्स लेहेंग्याच्या फॉलमध्ये अशा प्रकारे लपवण्यात आले होते की फॉलच्या आत काही लपवले आहे असे वाटणारच नाही. सुरुवातीला एनसीबी टीमला चुकीची माहिती मिळाल्याचे वाटले. मात्र, नंतर कसून तपास केला असता, लेहेंग्याच्या फॉलमध्ये हे ड्रग्स लपवण्यात आल्याचे उघड झाले.

Exit mobile version