शोपियान जिल्ह्यातील द्राच कीगाम भागात ४ ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत ५ ऑक्टोबरला सकाळी जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले. सध्या या परिसरात इतर दहशतवादी असल्याच्या भीतीने सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे.
४ ऑक्टोबरच्या रात्री या भागात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांसह शोधमोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना त्यांच्या जवळ येताना पाहिले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि प्रकाशाची विशेष व्यवस्था केली.
तीन दहशतवाद्यांच्या खात्माला दुजोरा देताना एडीजीपी काश्मीर विजय कुमार म्हणाले की, तिघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. हनान बिन याकुब आणि जमशेद यांचाही मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे. हे दोघेही पुलवामा येथील पिंगलना येथे एसपीओ जावेद दार आणि पुलवामा येथील पश्चिम बंगालमधील एका मजुराच्या हत्येत सामील होते.
हे ही वाचा
दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी
२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले
दुर्दैवी!! गरबा खेळताना मुलगा गेला पाठोपाठ वडीलही मृत्युमुखी
रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
रात्रभर अधूनमधून गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ५ ऑक्टोबरला सकाळी सुरक्षा दलांना दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली होती पण ते मान्य झाले नाहीत. यानंतर सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.