उद्योगपतीला वाचविण्यासाठी तीन आयपीएस अधिकारी महिलेला छळत होते!

निलंबनाची कारवाई, आंध्र प्रदेश सरकारचे कठोर पाऊल

उद्योगपतीला वाचविण्यासाठी तीन आयपीएस अधिकारी महिलेला छळत होते!

आंध्र प्रदेशमध्ये तीन आयपीएस अधिकाऱ्यांनी एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी म्हणून मुंबईतल्या एका अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात गोवून तिला अटक करुन तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेश सरकारनं ही कारवाई केली असून कारवाई करण्यात आलेले अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी असून त्यांनी कर्तव्य बजावत असताना आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

उद्योगपती आणि वायएसआर काँग्रेसचे नेते कुक्काला विद्यासागर यांच्याविरुद्ध मुंबईतील अभिनेत्रीने लैंगिक छळाची तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव होता. पण, तिने तक्रार मागे घेतली नाही म्हणून तिला आंध्र प्रदेशमध्ये खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलं. शिवाय तिचा सुमारे दीड महिना शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तिच्याविरुद्ध खोटं प्रकरण उभं करुन या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री आणि तिच्या आईवडिलांना २ फेब्रुवारी रोजी अटक केली. तब्बल ४२ दिवसांनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

हे ही वाचा..

‘बाप्पा पावणार, महायुतीचे सरकार पुन्हा येणार !’

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ही नौटंकी !

नापाक इरादे… भारत- बांगलादेश सीमेवर आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्याविषयी चर्चा

युपीमधून धर्मांतरासाठी नेत होते नेपाळला, हिंदू संघटनांनी काळे फासून पास्टरला लावले पळवून !

या प्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने कारवाई करत तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्याच्यावर मुंबईतील एका अभिनेत्रीला सापळ्यात अडकवणे, अटक करणे आणि त्रास दिल्याचा आरोप आहे. पीएसआर अंजा नेयुलू, कांथी राणा टाटा आणि विशाल गुन्नी अशी निलंबित करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आहेत. तपास अहवालात तिघांकडून पदाचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे.

Exit mobile version