सहा गाड्या धडकल्या; तीन मृत्यू

सहा गाड्या धडकल्या; तीन मृत्यू

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर आज (१८ ऑक्टोबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर यामध्ये तब्बल सहा वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वाहने एकमेकांवर आदळली यामध्ये दोन टेम्पो, दोन कार, खाजगी बस आणि ट्रेलर एकमेकांवर आदळले. या अपघातात कारचा चालक, अन्य एकजण आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा चालक अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

नटवर सिंह म्हणतात, काँग्रेसला मिळतील पाचपैकी शून्य

युवराज सिंगला का झाली अटक?

‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी कंपनी, डेल्टा फोर्स व देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना व मृतांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर मार्गावरील अपघातग्रस्त वाहने ट्रेनच्या सहाय्याने बाजूला करत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Exit mobile version