एजाज खानला ३ दिवसांची कोठडी

एजाज खानला ३ दिवसांची कोठडी

अमली पदार्थांच्या प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आलेला अभिनेता एजाज खान याला न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढचे तीन दिवस एजाज हा नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत असणार आहे. मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबेने एजाज खानला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. एजाज राजस्थान वरून परतल्यावर लगेचच एनसीबीने त्याला ताब्यात घेतले. एजाजच्या घरी तपास करताना एनसीबीला अमली पदार्थ सापडले होते.

बुधवारी एनसीबीने एजाज खानला न्यायालयात हजर केले. त्याआधी एनसीबीने त्याची आठ तास चौकशी केली आहे. अंधेरी लोखंडवाला भागात तपास करत असताना एनसीबीने एजाज खानच्या घराचीही झाडाझडती केली होती. यावेळी एनसीबीला ४.५ ग्रॅम ‘ऍल्प्रोझोल’ गोळ्या सापडल्या होत्या. पण एजाज याच्या अटकेचे मुख्य कारण तो कुप्रसिद्ध अशा ‘बटाटा गॅंग’चा सदस्य आहे.

हे ही वाचा:

इशरतच्या पाठिराख्यांचा पर्दाफाश

‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे

अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

फडणवीसांनी केली आव्हाडांची बोलती बंद

शादाब फारूक शेख उर्फ शादाब बटाटा हा एक मोठा ड्रग्स तस्कर. या शादाब बटाटाला गेल्या गुरुवारी एनसीबीने अटक केली. यावेळी बटाटकडे दोन किलो मेफेड्रोन हा बंदी असलेला अमली पदार्थ सापडला. शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर बटाटाची कस्सून चौकशी करण्यात आली. या चौकशीत शादाब बटाटा याने अनेक महत्वपूर्ण खुलासे केले. या चौकशीत एजाज खान हा बटाटा गँगचा एक सदस्य असल्याची माहिती समोर आली. याच माहितीच्या आधारे एजाज खान याला अटक कारण्यात आली आहे. एजाज खान याने हे सगळे आरोप फेटाळले असले तरी पुढे एनसीबीच्या तपासातून काय पुढे येते याकडे लक्ष आहे.

अभिनेता म्हणून फारसे यश न मिळाल्यानंतर एजाज खान याने फिअर फॅक्टर, बिग बॉस, खतरो के खिलाडी सारखे काही रिऍलिटी शो केले होते. या आधीही २०१८ साली एजाज खान याला २.२ लाख रुपयांचे अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी बेलापूर, नवी मुंबई येथून अटक करण्यात आली होती. तर धार्मिक भावना दुखावून धार्मिक तेढ वाढवणारी आक्षेपार्ह विधाने करण्यासाठीही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

Exit mobile version