35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरक्राईमनामातलावांत पोहायला गेलेली तीन मुले बुडाल्याची शंका,

तलावांत पोहायला गेलेली तीन मुले बुडाल्याची शंका,

चप्पल आणि कपडे आढळल्याने शोधमोहीम सुरूच

Google News Follow

Related

चंद्रपूरमध्ये पोहायला गेलेली तीन मुलं तलावात बुडल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. कोरपना तालुक्यातील आवारपूर इथल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात काल २६ जानेवारीला हि घटना घडली आहे. हि तीनही मुलं दहा वर्षांची असून ती एकाच वर्गात शिकत असल्याची माहिती मिळाली आहे.  तलावाजवळ या तीनही मुलांचे रात्री चप्पल आणि कपडे ठेवलेले आढळले आहेत.

काल प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने सिमेंट कंपनीच्या कॉलनीत राहणारी ही मुलं खेळायला बाहेर पडली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. रात्री कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावाजवळ मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आले असून . त्यामुळे त्यांचा तलावात शोध घेण्यात आला. परंतु रात्री शोध न लागल्यामुळे सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली.

हे ही वाचा:

दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन

१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी

लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण

पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली

अंधारामुळे रात्री थांबवलेली शोधमोहीम आज सकाळी पुन्हा सुरु
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात नाल्याचे पाणी अडवण्यासाठी लहान तलाव निर्माण करण्यात आला आहे. या तलावात तिन्ही मुलं बुडाल्याची माहिती मिळत आहे. या तिघांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाला बोलावण्यात आलं. रात्री या परिसरात गडद अंधार असल्यामुळे शोधमोहीमेत अडथळे येत होते. शिवाय अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडूनही लाईटची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे रात्री उशिरा त्यांचा शोध थांबवून आज सकाळपासून पुन्हा एकदा शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.
तिन्ही मुले एकाच शाळेत शिकत होते. 
ही तिन्ही मुले एकाच सिमेंट कंपनीमधील अधिकाऱ्यांची असून त्यां सगळ्याच मुलांचे वय दहा वर्षे असल्याचं कळले आहे . तसंच तिघेही एकाच शाळेत शिकत असल्याचं कळल आहे. यु्द्धपातळीवर या मुलांचा शोध घेतला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा