खोकल्याच्या सिरपच्या बाधेमुळे तीन मुलांचा मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर, दिल्ली सरकारने तीन डॉक्टरांना निलंबित केले आहे. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती. मोहल्ला क्लिनिकमधून ही औषधे देण्यात आली होती. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. या घटनेमुळे केजरीवाल सरकार अडचणीत आले आहे.
कलावती सरन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये डेक्स्ट्रामेथोरफान विषबाधेची सोळा प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यापैकी तीन मुलांचा मृत्यू रुग्णालयात झाला होता. या मुलांना दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिकमधून औषध लिहून दिले होते.
या घटनेवरून असे लक्षात येते की, लहान वयोगटातील मुलांसाठी औषधाची काटेकोरपणे शिफारस केली जात नाही असे डॉ. सुनील कुमार म्हणाले.
भाजप आणि काँग्रेसने या घटनेबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्याची आणि तीन मुलांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. मुलांच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारच्या पत्रानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. असे दिल्ली सरकारने सोमवारी दिलेल्या अधिकृत आदेशात म्हटले आहे. समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
शिवभोजन थाळीच्या नावावर दोन घोट ज्युस
राष्ट्रपती राजवटीच्या सर्व कारणांची महाविकास आघाडी सरकारकडून ‘पूर्तता’
‘एकटे निवडणूक जिंकता येत नाही म्हणून शिवसेनेची जोडतोड करून सत्ता’
शत्रुघ्न सिन्हांचे कुटुंबीय आता ईडीच्या रडारवर येणार?
मात्र, दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई आणि उपचार घेत असलेल्यांना दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी दिल्ली सरकारकडे केली आहे. दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंग बिधुरी म्हणाले की, मोहल्ला क्लिनिकमधील डॉक्टरांच्या अपात्रतेमुळेच निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे.