संजय पांडेंवर तीन गुन्हे दाखल, सीबीआयची छापेमारी

संजय पांडेंवर तीन गुन्हे दाखल, सीबीआयची छापेमारी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावून ५ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यांनतर त्यांची नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजमधील सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली गेली. यानंतर आता संजय पांडे यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

२००९ ते २०१७ या काळात एनएससी कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात तीन गुन्हे आणि २ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सीबीआयने संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरांवरदेखील छापेमारी सुरू केली असून, मुंबईत जवळपास आठ ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. सीबीआयने याप्रकरणी एकूण १८ ठिकाणी छापे टाकले आहेत. यात मुंबईत ८, पुण्यात २, चंदीगड १, लखनऊ आणि कोटा येथे प्रत्येकी एक, तर दिल्ली एनसीआरमध्ये ५ छापे टाकण्यात आले आहेत.

सीबीआयने एनएससी अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘चिन्ह’ जाणार?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाराणसीमध्ये १ हजार ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला

दरम्यान, संजय पांडे यांनी चित्रा रामकृष्ण प्रकरणात ऑडिट कंपनी तयार केली होती. ही कंपनी फक्त संजय पांडे यांची होती. २००१ मध्ये संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या ऑडिट कंपनीने एनएससी सर्व्हरशी छेडछाड केली. या कंपनीने कोणालाही अलर्ट न करता सर्व्हरमध्ये छेडछाड कशी केली हे शोधण्यासाठी सीबीआयने २०१८ पासून एनएससी लोकेशन घोटाळा प्रकरणाचा तपास करत आहे. ३० जून रोजी संजय पांडे निवृत्त झाले होते आणि तीन वर्षांनंतर ईडीने त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले.

Exit mobile version