लुधियानाच्या वायूगळतीने घेतला तीन हुशार मुलांचा घास

भविष्याची सुखी स्वप्ने रंगवतच तीन दशकांपूर्वी ते बिहारमधून लुधियानाला आले होते. मात्र हे सारे काही कधी संपले.

लुधियानाच्या वायूगळतीने घेतला तीन हुशार मुलांचा घास

लुधियाना येथे झालेल्या वायूगळतीने पाच जणांच्या कुटुंबाचा जीव घेतला. त्यात तीन कोवळ्या, हुषार मुलांच्या जाण्याने संपूर्ण शहरच हळहळले आहे. त्यांच्या वह्या, सरस्वतीचे काढलेले चित्र आणि त्यांनी भविष्याची रंगवलेली स्वप्ने आता त्यांच्या वर्गापुरतीच सीमित राहिली आहेत.

शनिवारचा दिवस हा कविलाश कुमार (४०) आणि त्यांच्या पत्नीसाठी आनंदाचा दिवस होता. त्यांची मुले शिकत असलेल्या साहनेवाल येथील सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेत ते पालकसभेला जाऊन आले होते. त्यांच्या मुलांची प्रगती ऐकून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. भविष्याची सुखी स्वप्ने रंगवतच तीन दशकांपूर्वी ते बिहारमधून लुधियानाला मजूर म्हणून आले होते. मात्र हे सारे काही कधी संपले, हे त्यांना कळलेही नाही. विषारी वायूच्या गळतीने होत्याचे नव्हते झाले. कविलाश, त्याची पत्नी आणि तीन मुले कल्पना (१६), अभय (१३) आणि आर्यन (१०) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

‘दोघेही पालक आणि त्यांची तिन्ही मुले पालकसभेला आली होती. ते सर्व वर्गशिक्षकांना भेटले होते. ते हयात नाहीत, हे सत्य मी स्वीकारूच शकत नाही,’ असे शाळेच्या मुख्याध्यापक सिस्चर शेरीन थॉमस म्हणाल्या. या मुलांच्या वह्या ही त्यांच्या शिक्षकासाठी अतिशय वेदनादायी आठवण राहिली आहे. या मुलांना त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची होती.

हे ही वाचा:

मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे परीक्षक झोनफ्रिलोंचे अकाली निधन; अनेकांना धक्का

प्रतिभा पवार का हसत होत्या ? सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत ?

महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे निधन

नवा अध्यक्ष झाला तर काय अडचण आहे… अजित पवारांच्या भूमिकेमुळे सगळेच दचकले!

हिंदीच्या शिक्षिका सीमा रतन या तिन्ही मुलांना शिकवायच्या. कल्पनाने चितारलेले सरस्वती देवीचे चित्र शिक्षकांच्या खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. ‘मी त्यांचे आनंदी चेहरे कधीच विसरू शकत नाही,’ त्या सांगतात. ‘कल्पनाच्या हातात कला होती. मात्र तिला डॉक्टर होण्याची इच्छा होती. तिला तिच्या कुटुबांची आर्थिक परिस्थिती चांगली करायची होती आणि त्यासाठी ती प्रयत्न करत होती,’ असे त्या म्हणाल्या. अभय हा अष्टपैलू होता आणि कोणतीही मदत करण्यास तो एका पायावर तयार असे… अभयच्या वर्गशिक्षिका गुरप्रीत मनगार सांगतात. तर, आर्यन हा हुषार मुलगा होता. अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांनाही तो मदत करत असे, अशी आठवण अभयच्या शिक्षिका मोनिका यांनी सांगितली.

Exit mobile version