नाशिकमध्ये दोन महिलांसह तीन बांग्लादेशींना अटक !

एटीएस पथकाची कारवाई

नाशिकमध्ये दोन महिलांसह तीन बांग्लादेशींना अटक !

नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातून एक तरुण आणि दोन महिला अशा तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. उपजिविकेसाठी ते दोन महिन्यांपूर्वी शहरात आल्याची माहिती असून संशयित महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होत्या.
गुप्त माहितीच्या आधारे एटीएस पथकाने कारवाई करत तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

बांग्लादेशात हिंसाचार पसरल्यानंतर भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी होऊ नये यासाठी सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले असून सुरक्षा दल सर्व गोष्टींवर नजर ठेवून आहे. मात्र, तरीही बांगलादेशीं नागरिकांचा भारतात शिरकाव होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतेच नवी मुंबईमधून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, नाशिकमधून तीन बांग्लादेशींना एटीएस पथकाने अटक केली आहे.

हे ही वाचा..

बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बोरिवलीत जनआक्रोश

तृणमूल काँग्रेसच्या खासदार रचना बॅनर्जीचा माफीनामा

तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे नागरिकत्व मागणाऱ्यांना न्याय नाही

एआयएमपीएलबी: सेक्युलर सिव्हिल कोड मुस्लिमांना मान्य नाही!

तीन बांगलादेशी नागरिक पाथर्डी गाव परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे कारवाई करत तिघांनाही ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत संशयित दोन महिन्यांपूर्वी उपजिविकेसाठी शहरात दाखल झाल्याचे निष्पन्न झाले.तसेच या बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या जाधव नामक व्यक्तीला देखील ताब्यात घेतले आहे. संशयित महिला याच भागातील ब्युटी पार्लरमध्ये काम करीत असल्याची माहिती आहे. एटीएस पथकाने या संशयितांना अटक करून इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यापुढील तपास इंदिरानगर पोलिसांकडून केला जाणार असल्याचे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक शरमाळे यांनी सांगितले.

Exit mobile version