नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने मुंबईतील पूर्व उपनगरातील भांडुप येथे एका घरातून ५० किलो एमडी (मफेड्रोन) या अमली पदार्थासह दोन जणांना अटक केली आहे. दुसऱ्या एका कारवाईत एनसीबीने ४८ किलो गांजासह एकाला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १० कोटी एवढी किंमत असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
किशोर नारायण पालकर आणि राहुल शेडगे असे भांडुप येथून अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दुसऱ्या प्रकरणात त्यांनी नारायण प्रधा (३६) याला अटक केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई विभागाला गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार भांडुप येथे एका घरात छापा टाकला, या छाप्या दरम्यान घरातील एका प्लास्टिकच्या डब्यात लपवून ठेवण्यात आलेल्या पांढऱ्या रंगांची पावडर मिळून आली, एनसीबीने ही पावडर तपासली असता ती एमडी म्हणजेच मफेड्रोन हा अमली पदार्थ असल्याची खात्री झाली.
एनसीबीने या घरातून ४६.८ किलो एमडी जप्त केली आहे. या प्रकरणी किशोर नारायण पालकर आणि राहुल शेडगे यांना अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत त्यांनी हे अमली पदार्थ महाड औद्योगिक परिसर, जिल्हा रायगड येथील प्रयोगशाळेत तयार केल्याचे समोर आले. एनसीबीने महाड येथील येथील एका प्रयोगशाळेवर छापा टाकून संशयास्पद रसायन जप्त करण्यात आले असल्याची माहिती दिली.
हे ही वाचा:
भाजपा आमदार योगेश सागर यांच्याकडून ‘सामूहिक विवाह सोहळ्या’चे आयोजन!
राष्ट्राध्यक्ष पुतीन लवकरच येणार भारत दौऱ्यावर
बलुचिस्तानमधील संघर्ष, परराष्ट्र धोरणावरून इम्रान खान यांनी पाक सरकारला सुनावले
बांगलादेशात रवानगी करण्यात आलेला घुसखोर १४ वर्षानंतर बिहारमध्ये सापडला!
दरम्यान, एनसीबीने दुसऱ्या प्रकरणात ४८ किलो गांजा या अमली पदार्थासह नारायणला अटक करण्यात आली आहे. नारायण हा गांजाची विक्री करण्यासाठी मुंबईत आला असता खबऱ्याच्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली आहे.एनसीबीने दोन्ही प्रकरणात जप्त केलेल्या अमली पदार्था आंतरराष्ट्रीय बाजरापेठेत १० कोटी एवढी किंमत असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोघावर डीआरआयने एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार दोन गुन्हे दाखल केल्याचे समोर आले आहे. सध्या दोघे जामिनावर बाहेर असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.