पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

एटीएस पथकाची पीएफआय विरोधात पनवेलमध्ये मोठी कारवाई

पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

टेरर फंडिंग तसेच देशाविरुद्ध कारवाई करत असल्याच्या संशयावरून बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेचा पनवेल येथील सेक्रेटरी आणि दोन सदस्यांना एटीएसच्या पथकाने बुधवारी अटक केली आहे. या तिघांविरुद्ध एटीएसच्या काळाचौकी पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशातील दहशतवादी कारवाईमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडार होती. सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या संघटनेच्या देशभरात असलेल्या कार्यालयावर छापेमारी करून १०० पेक्षा अधिक पदाधिकारी आणि सदस्यांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन, रिहॅब इंडिया फाऊंडेशन आणि ऑल इंडिया इमाम्स कौन्सिलसह पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याच्या संलग्न संघटनांवर केंद्र सरकारने दहशतवादात सहभाग असल्याच्या संशयावरून पाच वर्षासाठी बंदी घातली आहे. बंदी असतांना देखील या संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यामध्ये छुप्या बैठका सुरू आहेत.

हे ही वाचा:

भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’

पीएफआयचे पनवेल येथील पदाधिकरी आणि काही कार्यकर्ते छुप्या बैठका घेत असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने बुधवारी पनवेल येथे एका ठिकाणी छापेमारी करून तीन जणांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक केली आहे. या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे तिघे बंदी घालण्यात आलेल्या पीएफआयच्या नेत्याच्या सांगण्यावरून जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकरी यांना एकत्रित आणून त्यांच्या बैठका घेत होते अशी माहिती समोर आली आहे.

Exit mobile version