हार्दिक पाटील यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

हार्दिक पाटील यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

विरारमधील रहिवासी आणि आयर्नमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या हार्दिक पाटील यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या पेट्रोल बॉम्बप्रकरणी तीन जणांना विरार पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे.

वैयक्तिक वादातून घडलेल्या या घटनेत हार्दिक पाटील यांच्या घराबाहेर हे पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले. त्याचा सीसीटीव्ही पुरावाही आहे. यासंदर्भात हार्दिक पाटीलने सांगितले की, ४ मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास ३ मुले माझ्या घराबाहेर आली आणि त्यांनी पेट्रोल बॉम्ब टाकले. त्यासंदर्भात विरार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यात कांचन महेश ठाकूर याचेही नाव त्यात असल्याचे मला पोलिसांकडून कळले आहे.

हे ही वाचा:

आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

खंडणीखोर सरकारने पोलिसांकरवी वसुली सुरू केली तेव्हा पोलिसांचा धाक संपला

महिला कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याबद्दल इम्तियाझ जलील यांच्यावर गुन्हा दाखल

जुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात

कांचन महेश ठाकूर यांच्याशी माझे कोणतेही संबंध नाहीत. कोणतीही समस्या नाही. कांचनकडून हे कुणीतरी करायला लावले आहे. ही घटना घडण्यापूर्वी ३ आठवडे आधी सनी ठाकूर, रोहन ठाकूर यांनी मला मारहाण करण्याची, जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, त्याच्या बायकोपासून दूर राहण्यास मला त्यांनी सांगितले. यासंदर्भात मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मला जर कोणतीही हानी यादरम्यान झाली तर याची जबाबदारी कांचन ठाकूर आणि सनी ठाकूर यांची असेल. पोलिसांनी आता तीन जणांना यासंदर्भात अटक केली आहे, कांचन ठाकूरला मात्र पकडण्यात आलेले नाही.

हार्दिक पाटील हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारतीय खेळाडू असून त्यांना आयर्नमॅन हा पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यंत १० पूर्ण तसेच १६ अर्ध आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केलेले ते पहिले भारतीय खेळाडू आहेत. अशा प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरावर अशाप्रकारे खुलेआम हल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Exit mobile version