सुली डिल्स, बुलीबाई ऍपनंतर आता क्लब हाऊस प्रकरण; तिघांना बेड्या

सुली डिल्स, बुलीबाई ऍपनंतर आता क्लब हाऊस प्रकरण; तिघांना बेड्या

सुली डिल्स आणि बुलीबाई ऍपनंतर आता ऑडिओचॅट ऍप्लिकेशनच्या ‘ क्लब होऊस ‘ ऍपने धुमाकूळ घातला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

आकाश, जेष्णव आणि यश पराशर अशी या आरोपींची नावे असून, त्यांना हरियाणातून अटक करण्यात आली आहे. त्या तिघांनी कियारा नावाने ॲप्लिकेशन बनवल होते. या ऍपद्वारे मुस्लिम महिलांची बदनामी केली जात होती. या लोकांनी क्लब हाऊस चॅट मध्ये वर्चुअल चॅट रूम म्हणून महिलांच्या विविध अंगांच्या भागांचे फोटो टाकत त्याचा लिलाव करत होते. वर्चुअल चॅटमध्ये त्यांनी दोन रूम बनवल्या होत्या. आकाश दोन्ही ग्रुपचा मोडरेटर होता.

या प्रकरणी रझा अकादमीने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. आकाशला करनाल मधून तर जेष्णव आणि यशला फरीदाबाद मधून अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे. या आरोपींना मुंबईत त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी १९ ते २१ वयोगटातील असून मध्यमवर्गीय कुटुंबियातील आहेत.

हे ही वाचा:

फेक न्यूज पसरवणाऱ्या पाकिस्तानी वेबसाईट आणि यूट्यूब चैनल्सवर भारत सरकारची कारवाई

झारखंडमध्ये दारू अखंड…घरोघरी दारूचा पुरवठा करणार

तीन महिने लवकर झाला प्रियांका – निकच्या मुलीचा जन्म?

किडनीच्या बहाण्याने गायिकेने घातला साडेआठ लाखांचा गंडा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बुली बाई अ‍ॅप हे वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. या अ‍ॅपद्वारे मुस्लिम महिलांना टार्गेट करुन त्यांना अपमानित केलं जात होतं. त्यानंतर आता क्लब हाऊस अ‍ॅपप्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version