मखमलाबाद आणि म्हसरुळ येथील तीन वेगवेगळ्या बँकांचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून नुकसान करणाऱ्या तीन परप्रांतीय चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या चोरांचा पाठलाग करत असताना डीबी पथकाच्या गाडीचा धक्का जोरात लागल्यामुळे एका चोराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ऋषिकेश शरद आहेरराव यांनी केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी वीरेंद्रकुमार फुलकरण धरी (वय ३३), त्याचा साथीदार धर्मेंद्र ऊर्फ राहुल रामनारायण (वय ३३) आणि अतरकुमार रामदयाल चौधरी (वय २८) हे मुळचे उत्तर प्रदेशमधील असून त्यांनी ३ जुलै रोजी रात्री मखमलबादच्या शांतीनगर येथील एच. एफ. सी. बँकेचे एटीएम मशीन, तसेच म्हसरूळच्या किशोर सुर्यवंशी मार्गावरील एच. डी. एफ. सी. बँकेचे एटीएम आणि खमलाबाद येथील युनियन बँकेचे एटीएम मशीन पैसे चोरण्याच्या उद्देशाने फोडण्याचा प्रयत्न केला. या तीनही एटीएम मशीन फोडून त्यांचे नुकसान केले.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही
नरेंद्र मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला सुनावले खडेबोल
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांची निवड?
इंदूर धुळे मार्गावर ट्रक हॉटेलमध्ये घुसला; ७ ठार
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या पथकाला माहिती मिळताच पथकाने तीनही चोरट्यांना अटक केली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गाडी घेऊन शोध सुरू केला असता या गाडीचा धक्का लागून पळून जाणाऱ्या चोराला धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.