पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ही हत्या पैसे आणि कौटुंबिक वादातून केल्याची पोलिसांना संशय आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
पुण्यातील नाना पेठ परिसरात रविवारी सायंकाळी वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून कोयत्याने वार करुन खून केला होता. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामागील नेमकं कारण अजून समोर आलेले नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची कसून चौकशी केली जात आहे. गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी या तिघांची नावे आहेत.
सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून नाना पेठेत वनराज आंदेकर आणि त्यांच्यासोबत एक जण उभे असताना त्यावेळी सात दुचाकीवरुन १४ ते १५ जण आले. ते अचानक वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करुन सर्व घटनास्थळावरुन पळ काढतात.
हे ही वाचा:
मद्यधुंद प्रवाशाने बेस्ट बसच्या ड्रायव्हरकडून स्टेअरिंग हिसकावलं आणि…
आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीचा छापा
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाची तुलना तरी होईल का?
विद्यार्थ्यांना पारंपारिक वेशभूषा, वस्तू वापरावर बंदी आणल्यास होणार कारवाई
वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते.