मणिपूरमध्ये ‘प्रीपाक- प्रो’ प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

कमांडो युनिट थौबल आणि आसाम रायफल्सची संयुक्त कारवाई

मणिपूरमध्ये ‘प्रीपाक- प्रो’ प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलीपाक (प्रीपाक- प्रो) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी यासंदर्भातील माहिती दिली. कमांडो युनिट थौबल आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त कारवाईनंतर खंडणीमध्ये सहभागी असलेल्या या तिघांना एचडीएफसी बँकेजवळ पकडण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ एसपी थौबल जिल्ह्याच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि त्यांच्याकडे एक ग्रेनेड, मागणी पत्रे आणि बरेच काही सापडले आहे.

माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सदस्य खंडणीच्या गुन्ह्यात सामील होते, असे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रीपाक (प्रो) संघटनेचे काही सक्रिय कॅडर थौबल अथोकपम परिसरात आणि आजूबाजूच्या भागात फिरत असल्याच्या माहितीवर कारवाई करत, कमांडो युनिट थौबलची एक संयुक्त टीम आणि ओसी-सीडीओ, थौबल यांच्या नेतृत्वाखालील चार एआरची (आसाम रायफल्स) एक तुकडी यांनी सीनियर एसपी थौबल जिल्ह्याच्या पर्यवेक्षणाने, एचडीएफसी बँकेजवळच्या परिसरात धाव घेतली आणि तीन सक्रिय कार्यकर्त्यांना अटक केली. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा : 

जौनपूरच्या अटाला मशिदीच्या सर्वेक्षणाच्या निर्णयावर होणार सुनावणी

चिन्मय दास यांच्या जामीन सुनावणीची तारीख बदलण्याची याचिका फेटाळली

कपूर कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला!

जोडे पूजण्यासाठी, जोडेपुशे म्हटले; जोड्यांनी मार खाल्ला…

नंब्रम इंद्रजित सिंग, राजकुमार मोहन साना आणि वारेपम अल्बर्ट मीतेई थोई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालयांमधून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, चुराचंदपूर आणि चंदेल जिल्ह्यांतील स्वतंत्र ऑपरेशनमध्ये १० बंदुका आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Exit mobile version