वाल्मिक ‘आका’चा पाय खोलात; तीन आरोपींनी दिली हत्येची कबुली

सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे

वाल्मिक ‘आका’चा पाय खोलात; तीन आरोपींनी दिली हत्येची कबुली

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बुधवारी पार पडल्यानंतर या हत्या प्रकरणाचा कर्ताकरविता वाल्मिक कराडचं असल्याचे समोर आल्यानंतर आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात अडकल्याची माहिती समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर पद्धतीनं झालेल्या हत्या प्रकरणाची कबुली तीन प्रमुख आरोपींनी दिल्याची माहिती समोर आली आहे. या कबुलीनंतर आता प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी बुधवारी पार पडल्यानंतर अटकेत असलेल्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे. माहितीनुसार, सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचे समजते. सुदर्शन घुले याने, “होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला,” अशी कबुली पोलिसांना दिली.

आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख यांनी आम्हाला मारहाण केली. याचा राग आमच्या मनता होता. तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख यांचा अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही २९ डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली. तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडीओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत, असे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. त्यामुळे आता या सगळ्यांचा आका असलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

दिशा सालीयनच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाच्या गोष्टी आल्या समोर

कोरटकर सापडला बातमी मात्र फरार !

उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ???

जोकोविचने मुसेट्टीला पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

दरम्यान संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात वकील उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा युक्तिवाद केला. यावेळी उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला तीनवेळा फोन केले होते. याचा सीडीआर रिपोर्ट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडला. पोलिसांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख नव्हता.

फाजिलपणा हेच पक्षकार्य ? | Mahesh Vichare | Anil Parab | Uddhav Thackeray | Sushma Andhare |

Exit mobile version