दक्षिण दिल्लीतील संगम विहारमध्ये हिंदू मंदिरासमोर गायीचे अवशेष सापडल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर रविवारी परिसरात कथित द्वेषयुक्त भाषणे करण्यात आली होती. याबाबत स्थानिक मुस्लिमांनी भीती व्यक्त करून पोलिस तक्रार दाखल केली आहे.
गायीचे अवशेष आढळल्यानंतर आंदोलने करण्यात आली. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. या प्रकरणी आरोपींना अटक करावी, अशी मागणी पोलिस करताना दिसत आहेत. ४८ तासांच्या आत कारवाई न केल्यास तो परिसरातील दीड लाख ते दोन लाख मुस्लिमांना मारेल, असे एक व्यक्ती म्हणताना ऐकू येत आहे.
‘आम्ही परिसरात कायदेशीर कारवाई करत आहोत. या भाषणाबाबतची तक्रार सोमवारी प्राप्त झाली. त्या व्यक्तीला (व्हायरल व्हिडिओमध्ये) चौकशीसाठी बोलावले जाईल… योग्य प्रक्रिया पाळली जाईल,’ असे दक्षिण जिल्हा पोलिस विभागातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. व्हिडीओतील व्यक्तीने गळ्यात भाजपचे मफलर घातले आहे. परंतु ती व्यक्ती भाजपशी संबंधित नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ‘व्हिडिओचा स्रोत आणि सत्यताही अद्याप पडताळली गेलेली नाही. आम्ही प्रथम त्याची पडताळणी करू आणि जर त्यात सत्य आढळले तर कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल,’ असे एका दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
भाजपच्या प्रवक्त्यानेही या व्यक्तीशी आपला संबंध असल्याचे नाकारले. ‘आमच्या माहितीनुसार, तो फरिदाबादचा आहे. तो संगम विहारमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी आला होता. पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी. आम्ही या सर्वांचे समर्थन करत नाही,’ असे स्पष्टीकरण भाजपच्या प्रवक्त्याने दिले आहे.
गोहत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की गायीचे अवशेष कुत्र्याने मंदिराजवळ आणले होते. गायीची कत्तल कोणी केली आणि त्यात काही गैरप्रकार आहे का, हे पाहण्यासाठी आम्ही अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहोत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
स्थानिक मुस्लिम गटानेही याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. ‘भाजपच्या सदस्यांनी स्थानिकांना एकत्र केले आणि पोलिसांसमोर मुस्लिमांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनी दंगल भडकावण्याबाबतही भाष्य केले. परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण आहे… कृपया परिसरात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा,’ अशी तक्रार या गटाने केली आहे.
संगम विहारचे रहिवासी शनाउल हक म्हणाले, ‘रविवारी निदर्शने झाली आणि सर्वांनी आमच्या समुदायाविरुद्ध नारेबाजी केली. पोलfस कर्मचाऱ्यांनी नंतर आमच्याशी बोलून आमची तक्रार नोंदवली. आम्हाला आशा आहे की (व्हिडिओमधील) व्यक्तीला अटक केली जाईल. तो स्थानिक नाही.”
हे ही वाचा:
भारत टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत, ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या बाहेर जाणार?
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती!
भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!
आम्ही ती चूक का करू, म्हणत केजरीवाल यांना ‘सर्वोच्च’ दणका
हिंदू समुदायाच्या निदर्शनात सहभागी झालेल्यांपैकी एक, सागर पाराशर म्हणाले, “पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही म्हणून आम्ही आंदोलन केले. आम्हाला फक्त परिसरातील अवैध गाईच्या मांसाचा व्यापार थांबवायचा आहे. ज्याने गायीची हत्या केली आहे तो दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहे… त्याला अटक करावी अशी आमची इच्छा आहे.’
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पोलिस उपायुक्त (डीसीपी) अंकित चौहान यांनी परिसरात धाव घेतली आणि रविवारी उशिरापर्यंत आंदोलक स्थानिकांशी बोलून त्यांना शांत केले. जिल्हास्तरावर चौकशी सुरू असल्याचे आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.