रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेत आला मेल

पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेत आला मेल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. बँकेचे मुंबईतील मुख्यालय स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल अधिकृत मेल आयडीवर प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर १२ डिसेंबर रोजी रशियन भाषेत धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. याआधीही रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धमकीच्या ईमेलबद्दल बोलताना मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा ईमेल आला होता. हा ईमेल रशियन भाषेत होता आणि यामध्ये बँक उडवण्याचा इशारा देण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माता रमाबाई मार्ग (MRA मार्ग) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींचा तपास सुरू आहे. धमकीच्या ईमेलबद्दल इनपुट मिळाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी मेल पाठवणाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली आहे.”

माहितीनुसार, पोलीस अधिकारी ईमेल पाठवण्यासाठी व्हीपीएनचा वापर करण्यात आला होता का याचा तपास करत आहेत आणि ईमेल पाठवणाऱ्याचा आयपी ॲड्रेस देखील शोधत आहेत. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हा धमकीचा ईमेल आला. राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी मल्होत्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निवड केली.

हे ही वाचा :

दिल्लीतील शाळांना धमकीसत्र सुरूचं; सहा शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी देश एकजुटीने उभा

गुकेश ठरला ६४ घरांचा सर्वात तरुण विश्वविजेता!

रत्नागिरीत वायू गळती, ३० हून अधिक विद्यार्थ्यांना श्वसनासह उलट्यांचा त्रास!

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबईतील आरबीआय कस्टमर केअर सेंटरला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीकडून धमकीचा कॉल आला होता. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून तपास केला असता काहीही संशयास्पद आढळले नाही.

Exit mobile version