सलमानला ब्रिटनमधून धमकीचा मेल पाठवणाऱ्या विद्यार्थ्याला भारतात आणणार

लुकआउट नोटीस जारी

सलमानला ब्रिटनमधून धमकीचा मेल पाठवणाऱ्या विद्यार्थ्याला भारतात आणणार

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला काही काळापासून सतत धमक्या येत आहेत. मार्च महिन्यात सलमान खानला पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आला होता. सलमानला जीवे करण्याची धमकी देणारा हा मेल ब्रिटनमधून आला होता. त्यानंतर पोलिसांनी सलमानला वय दर्जाची सुरक्षा दिली. या धमकीच्या मेल प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास केला आहे. धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याला परत आणण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी सलमान खानला त्याच्या एका अधिकृत आयडीवर एक ई-मेल आला होता. सलमानने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी गोल्डी ब्रारला भेटावे आणि त्यांच्यातील मतभेद एकदाच मिटवावेत. अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे मेलमध्ये म्हटले होते.

पोलिसांच्या चौकशीमध्ये ब्रिटनमधील हा विद्यार्थी हरियाणाचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो वैद्यकीय शिक्षण घेत असून तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. मार्च महिन्यापासून तुरुंगात असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाने एका विद्यार्थ्याने सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे.

हे ही वाचा:

‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांकडे एअर इंडिया, इंडिगोचे लक्ष

भारतातील ४२,००० कुशल कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीच्या संधी

आता परदेशातील प्रेक्षकही बघणार ‘द केरला स्टोरी’

पैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून भीषण अपघात

या आरोपी विद्यार्थ्याचे ब्रिटनमधील शिक्षण संपत असल्याने या वर्षाच्या अखेरपर्यंत तो भारतात येण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. नियंत्रण कक्षाला फोन करून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुंबई पोलिसांनी अलीकडेच एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती.

Exit mobile version