मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

mukesh ambani

भारतचे प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचा फोन आला होता. रुग्णालयाच्या लँडलाईन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला, ज्यामध्ये कॉलरने अंबानी कुटुंबातील काही सदस्यांची नावे घेऊन त्यांना शिवीगाळ केली. धमकीचा फोन आल्यापासून हॉस्पिटल आणि मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आज, सकाळी रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी आली होती. या धमकीत मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसेच रिलायन्स एचएन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईतील डीबी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा 

नरेंद्र मोदींबद्दल आता पंकजा मुंडेंनी केले हे वक्तव्य

नवरात्र २०२२: सतीचे दात इथे पडले म्हणून दंतेश्वरी शक्तीपीठ

सी- लिंकवर झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू

दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी

याआधीही मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नुकतंच १५ ऑगस्टलाही एका व्यक्तीने मुकेश आणि नीता अंबानी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हासुद्धा रिलायन्स रुग्णालयात आठ वेळा धमकीचे फोन आले होते. फोन करणाऱ्याने तीन तासांत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा अंबानी कुटुंबियाला धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणाचाही तपास सुरु आहे.

Exit mobile version