24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामासलमानला पुन्हा धमकी; अज्ञाताकडून दोन कोटींची मागणी

सलमानला पुन्हा धमकी; अज्ञाताकडून दोन कोटींची मागणी

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला मेसेज

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला मिळणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूचं आहे. सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी धमकीचा मेसेज आला होता. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची मागणी केली असून पैसे न दिल्यास अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशीचं धमकी काही दिवसांपूर्वीही आली होती. त्यानंतर आरोपीने माफी मागत चुकून मेसेज केल्याचे म्हटले होते. त्याला पुढे अटकही करण्यात आली होती.

माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात ३५४ (२), ३०८ (४) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

प्रभू श्रीराम, सावरकरांचा डाव्या संघटनांकडून अपमान, अभाविप कार्यकर्त्यांचा संताप!

बांगलादेशमध्ये छळ झालेल्या हिंदूंच्या न्यायाच्या आशा संपल्या

‘प्रकल्पांना विरोध करायचा, मग ओरड करायची, हेच विरोधकांचे धोरण’

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देऊन आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला

बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आलं असून या प्रकरणानंतर सलमान खानला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. १९९८ मध्ये काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. सलमान खानच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबारही झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा