मंदिराभोवती कडेकोट सुरक्षाव्यवस्था
लखनऊ मधील सुप्रसिद्ध माणकेश्वर मंदिर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची एका निनावी पत्राद्वारे प्राप्त झाल्यानंतर या दोन्ही ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लखनऊ पोलीस आयुक्त डी के ठाकूर यांनी सांगितले की पोलिस याबाबत तपास करत आहेत.
एका निनावी पत्राद्वारे अशा प्रकारची धमकी देण्यात आल्यानंतर पोलीस यंत्रणा कार्यरत झाली आहे. पोलिसांकडून या प्रकाराचा तपास करण्यात येत आहे. लखनऊ पोलीस आयुक्त डी के ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याबरोबरच ते असेदेखील म्हणाले अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात निष्णात असणारे पोलीस यात प्रकरणाचा शोध घेत आहेत. ते म्हणाले मी स्वतः मंदिराच्या प्रमुखांशी आणि इतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक रित्या बोललो आहे आणि त्यांना पोलिसांच्या तयारी बद्दल सांगितले आहे.
यापूर्वी शुक्रवारी अलीगंज येथील हनुमान मंदिराच्या कर्मचाऱ्यांना देखील अशाच प्रकारे निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. या पत्रामध्ये एटीएसने दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपीस सोडून देण्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यामुळे या मंदिराभोवती देखील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
आजपासून भारत सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी
बीसीसीआयने धमकावल्याचे माजी क्रिकेटपटूचे आरोप
राहुलची राहुलला ‘प्रेम’ळ चपराक
पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही पत्रांमधील मजकूर एक समान दिसत आहे. पत्र पाठवणाऱ्याने लखनऊ मधील मोठी मंदिरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यालये आपल्या निशाण्यावर असल्याचे सांगितले आहे त्याबरोबरच पत्र पाठवणार याने दहा महत्त्वाचे हिंदू देखील त्यांच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले आहे. ही पत्रे टंकलिखित स्वरूपात पाठविण्यात आली असून त्याने स्वतःचे नाव ‘इंतजार’ असे लिहिले आहे. या आरोपीने प्रशासनाला स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळ पर्यंतची मुदत दिली आहे, असेदेखील या पोलिस अधिकाऱ्याकडून कळले आहे.