ताज महाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ

घटनास्थळी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ

ताज महाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ

आग्रा येथील जगविख्यात ताज महाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धमकीचा संदेश ई- मेलवर प्राप्त झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. धमकीचा ई- मेल मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांनी ताज महाल येथील सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे. शिवाय या ई- मेलनंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली. शिवाय आता ताज महालच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आग्रा पोलीस सध्या मेल कुठून आला याचा तपास करत आहेत.

घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक दाखल झाले असून येथील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. पर्यटन विभागाला ई- मेल प्राप्त झाला. त्याआधारे ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती ताज महाल सुरक्षा एसीपी सय्यद अरीब अहमद यांनी सांगितले. या तपासणीदरम्यान पर्यटकांमध्ये कोणतीही दहशत निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. परिसरात तपासणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

मंदिरांमधून मूर्तींची चोरी करणाऱ्या यासीन आणि आमीनच्या मुसक्या आवळल्या

भारत- चीन करारानंतर सीमेवर ‘सब शांती शांती है!’

चिन्मय कृष्णा दास यांच्या बाजूने लढणाऱ्या बांगलादेशी वकिलावर बांगलादेशात हल्ला

मालेगाव व्होट जिहाद घोटाळा: नामको बँकेच्या व्यवस्थापकासह सहव्यवस्थापकाला अटक

दुसरीकडे, उत्तर प्रदेश पर्यटन उपसंचालक दीप्ती वत्स यांनी सांगितले की, संशयास्पद ईमेल आग्रा पोलिसांना पाठवण्यात आला आहे, त्या आधारावर एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. तसेच, आता ताजमहालाला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही, फसव्या धमक्या देणारे काही घटक असे प्रकार करत राहतात. आता ही धमकी कोणी पाठवली, याचा तपास सुरू आहे, असेही दीप्ती वत्स यांनी सांगितले.

Exit mobile version