25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाचेन्नईहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

चेन्नईहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई विमानतळावर विमानाची तपसणी; सर्व प्रवासी सुखरूप

Google News Follow

Related

चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E5314 या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानाने चेन्नईवरून सकाळी ७ वाजता उड्डाण केलं होतं. त्यानंतर ८:४५ च्या दरम्यान ते विमान मुंबई विमानतळावर उतरलं. यावेळी विमानतळ प्रशासनाकडून या विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

इंडिगोचे 6E5314 हे विमान चेन्नईहून मुंबईसाठी निघाले होते. विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षितपणे विमानातून उतरले आहेत. या विमानात १७२ प्रवासी होते. सध्या या विमानाची तपसणी सुरू आहे. मुंबईत उतरल्यावर क्रूने प्रोटोकॉलचे पालन करत सुरक्षा एजन्सीच्या सूचनेनुसार विमान निर्जन ठिकाणी नेण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे विमान टर्मिनल परिसरात आणलं जाईल, अशी माहिती सांगितली जात आहे. या घटनेमुळे मुंबई विमानतळावरही अलर्ट जारी करण्यात आला आहे. या विमानाने आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर काही वेळासाठी ती धावपट्टी बंद करण्यात आली होती.

अलीकडच्या काळात विमानांना बॉम्ब धमकी मिळण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. यापूर्वी दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या विमानालाही अशीच धमकी मिळाली होती. दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असाच एक प्रकार समोर आला होता.

हे ही वाचा:

प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले

…आणि अचानक मनमोहन सिंग जागे झाले!

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला पोलीस कोठडी

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीची घटना २८ मे रोजी घडली होती. त्यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर हे विमान विमानतळावर पोहचताच प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी गर्दी केली होती. बॉम्ब ठेवल्याची बातमी समोर आल्यानंतर आपत्कालीन मार्ग आणि मुख्य दरवाजे यांमधून प्रवाशांना सुरक्षित पद्धतीने बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर हे विमान तपासणीसाठी खुल्या ठिकाणी नेण्यात आलं होतं. दिल्ली विमानतळावर ही घटना घडली होती. मात्र, त्यानंतर ही अफवा असल्याची बाब समोर आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा