एका अज्ञात क्रमांकावरुन धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मसेजमध्ये देण्यात आली आहे. या धमकीच्या मेसेजनंतर पोलीस सतर्क झाले असून तातडीने या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.
मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे या संदेशात म्हटले आहे. या संदेशानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
हे ही वाचा:
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या कंपनीवर ईडीचा छापा!
१० वर्षात अर्थव्यवस्थेत विकास, पंतप्रधान मोदींमुळे प्रगती,पंतप्रधान मोदींचा जय अनुसंधानचा नारा!
मोठी घोषणा! ४० हजार सामान्य बोगी आता वंदे भारतप्रमाणे
“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”
पुणे पोलिसांनाही धमकीचा मेसेज
दरम्यान, पुणे पोलिसांच्या कंट्रोलरुमध्येही धमकीचा मेसेज आला होता. गुरुवारी रात्री पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमच्या वॉट्सअप नंबरवर पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याचा मेसेज आला होता. त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. बॉम्ब शोधक पथके देखील हॉस्पिटलमधे तैनात करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहे.