26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामासमीर वानखेडे यांना धमकीचा मेसेज

समीर वानखेडे यांना धमकीचा मेसेज

समीर वानखेडे यांच्या ट्विटरवर हा धमकीचा मेसेज आला आहे.

Google News Follow

Related

एनसीबीचे मुंबई माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. समीर वानखेडे यांच्या ट्विटरवर हा धमकीचा मेसेज आला आहे. समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली आहे. या धमकीच्या ट्विटबाबतही त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे.

जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून समीर वानखेडे यांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी  काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्हा दाखल होताच दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे यांना धमकीचे ट्विट आले आहे. वानखेडे यांना टॅग करून हा संबंधित व्यक्तीने हा मेसेज केला होता. यावर समीर  वानखडे यांनी त्याला रिप्लाय दिला. मात्र, त्यानंतर काही वेळातच धमकीचे ट्विट डिलीट करण्यात आले.

धमकी ज्या अकाऊन्टवरून करण्यात आली होती ते अकाऊन्ट त्याच दिवशी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून समीर वानखेडे यांनी दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम नसून समीर वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्माचा स्वीकार केल्याचे सिद्ध होत नाही, असे समितीने म्हटले आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीय कोट्यातून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

हे ही वाचा:

अग्निवीर भर्तीपूर्व परीक्षेत धावताना तरुण गतप्राण

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर सीबीआयची छापेमारी

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे

क्लीन चीट मिळताच समीर वानखेडे यांनी रविवार, १४ ऑगस्ट रोजी दलित व्यक्तीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गोरेगाव पोलिसांनी मलिक यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा