23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळ दौऱ्याच्या आधी आत्मघातकी हल्ल्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळ दौऱ्याच्या आधी आत्मघातकी हल्ल्याची धमकी

धमकी पत्रानंतर खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार २४ एप्रिल रोजी केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान दौऱ्यावर जाण्याच्या आधीच आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारे पत्र समोर आले आहे. या पत्रामध्ये आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर राज्यभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांनी या धमकी पत्राचा तपास सुरू केला आहे. हे पत्र मल्याळम भाषेत कोचीच्या एका व्यक्तीने लिहिले असून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांना पाठवण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यातच के. सुरेंद्रन यांनी हे पत्र पोलिसांना सुपूर्द केले. यानंतर पोलिसांनी या पत्रात पत्ता असलेल्या एन. के. जॉनी नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भवितव्य राजीव गांधींसारखेच असेल, अशी धमकी या पत्रात देण्यात आली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या एलटीटीईने आत्मघातकी हल्लेखोरांद्वारेच केली होती. दरम्यान जॉनी याने आपण पत्र लिहिल्याचा इन्कार केला आहे. पोलिसांनी पत्रातील मजकूर आपल्या हस्ताक्षराशी जुळला असला तरी त्यामध्ये आपला हात नसल्याचे म्हटले आहे.   धमकीच्या मागे कोणीतरी माझा द्वेष करणारी व्यक्ती असू शकते. ज्यांच्यावर मला संशय आहे त्यांची नावे मी दिली असल्याचे जॉनने म्हटले आहे.

मात्र, केरळ पोलिसांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची व्हीव्हीआयपी सुरक्षेची माहिती उघड केली असल्याचा आरोप राज्य भाजपने केला आहे. के सुरेंद्रन म्हणाले की, केरळमध्ये धार्मिक कट्टरतावादी शक्ती खूप सक्रिय आहेत. पीएफआय आणि एसडीपीआयपासून ते माओवादी संघटनांपर्यंतची नावे समोर आली आहेत, पण केरळ पोलिस कारवाई करत नाहीत असा आरोपही मुरलीधरन यांनी केला आहे. केरळशिवाय सहाय्य्क पोलीस महासंचालकांचे पत्रही माध्यमांमध्ये आले आहे. या पत्रात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेच्या संभाव्य धोक्यासह आणखी अनेक गंभीर धोक्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. परराष्ट्र राज्यमंत्री . मुरलीधरन यांनी हे पत्र मीडियामध्ये लीक होण्यासाठी राज्य पोलिसांची चूक असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

चिनी सैनिकांच्या कृत्यांना भारतीय जवान देणार त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

प्लास्टिकचा वापर सोडाल, तरच पुढे टिकाल!

काँग्रेसने ७० वर्षात एकाच देशात दोन देश निर्माण करण्याचे काम केले

अतीक अहमद, अश्रफच्या हत्येचा बदला घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यामध्ये कोची आणि तिरुअनंतपुरमला पहिली वंदे भारत एक्सप्रेस भेट देणार आहे. त्याच बरोबर पंतप्रधानांचा रोड शो करणार असून एक सार्वजनिक सभेलाही मार्गदर्शन करणार आहे. केरळ भाजपला पंतप्रधानांच्या या भेटीकडून मोठ्या आशा आहेत. दक्षिण भारतात भारतीय जनता पक्ष आपले पाय भक्कमपणे रोवत आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या रॉड शोसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत धमकीचे पत्र मिळणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता केरळमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा