धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी

पोलीस तपास जोरात

धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी

बागेश्वर धाम येथील पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे चुलत भाऊ लोकेश गर्ग यांच्या मोबाईलवर फोन आला,होता त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा चुलत भाऊ लोकेश गर्ग याच्या फोनवर धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणी छतरपूरमधील बमिठा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

चुलत भावाच्या मोबाईलवर आला कॉल
एफआयआरमध्ये लोकश गर्गच्या मोबाईलवर कॉल आला होता, ज्यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. २२ जानेवारी रोजी रात्री नऊ च्या सुमारास फोन आला होता. धिरेंद्र शास्त्री यांना तेराव्याची तयारी करायला सांगा असे फोन करणाऱ्याने सांगितले. फोन करणाऱ्याने आपले नाव अमर सिंह असं सांगितले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०६ आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

हे ही वाचा:

टाटा एआयजीच्या व्यासपीठावर कारुळकर प्रतिष्ठानचे सांकेतिक भाषा सत्र

कुस्ती अध्यक्ष बृजभूषण प्रकरणाच्या चौकशी समितीची अध्यक्ष मेरी कोम

ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’

‘जन गण मन’ : राष्ट्रगीत एक अभिमान गीत

काय आहे प्रकरण?
बागेश्वर धाम सरकार या नावाने प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपुरातील एका कार्यक्रमात चमत्कार करण्याच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी दावा केला की, एफआयआरच्या भीतीने कथा अकाली संपल्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर सोडले. असं म्हंटल जातं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, बागेश्वर धाम येथे मोठा उत्सव होणार असल्याने ते त्यांच्या प्रस्तावित तीन कथांमधील दिवस कमी करत आहेत. तेव्हापासून बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांच्या बाजूने आणि विरोधातील वाद सुरू आहेत .

Exit mobile version