अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमधील भूज येथून सोमवारी अटक केली. या दोन्ही आरोपींची नावे विकी सहाब गुप्ता (२४) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (२१) असून ते दोघेही बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मासिही गावातील आहेत.
सलमान खान याच्या वांद्रे घराबाहेर रविवारी गोळीबार करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत असताना पोलिस भुज येथे पोहोचले. या दोन्ही आरोपींना मंगळवारी सकाळी मुंबईत आणले जात आहे. दोन बाइकस्वारांनी रविवारी पहाटे पाच वाजता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर चारवेळा गोळीबार केला होता आणि तिथून पलायन केले होते. घटना घडली तेव्हा सलमान खान घरात होता. या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा मृत झाले नाही.
गोळीबार केल्यानंतर आरोपींनी दुचाकी जवळच्या चर्चजवळ सोडली होती. त्यानंतर ते चालत गेले आणि त्यांनी वांद्रे रेल्वे स्थानकात जाण्यासाठी रिक्षा केली. नंतर त्यांनी सांताक्रूझला जाण्यासाठी ट्रेन पकडली. नंतर त्यांनी पुढे जाण्यासाठी पुन्हा रिक्षा केली.
हे ही वाचा:
मीरारोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा संताप; चिकन दुकानदाराने ४ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार
जातीचा खुुळखुळा, करी देश खिळखिळा!
अरविंद केजरीवालांचा तिहारमधील मुक्काम लांबला; न्यायालयीन कोठडीत वाढ
उबाठा गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांचा भाजपमध्ये प्रवेश!
लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या हल्ल्याची जबाबदारी सोशल मीडिया पोस्टद्वारे वीकारली होती. सध्या तुरुंगात असलेला लॉरेन्स आणि गँगस्टर गोल्डी ब्रार याने अनेकदा सलमान खानला मारण्याची धमकी दिली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई आणि ब्रार यांनी सलमानला मारण्यासाठी मारेकऱ्यांना मुंबईत पाठवले होते.
सन १९९८च्या काळवीट शिकार प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खान याला लक्ष्य केले आहे. बिश्नोई समाजात काळवीटला पवित्र व पूजनीय मानले जाते.