अर्थसंकल्पीय अधिवेशनात मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मणिपूरमध्ये सध्या शांतता असली तरी सुरक्षा दलांकडून सातत्याने मणिपूरमध्ये शोध मोहिमा राबवल्या जात आहेत. हिंसाचाराच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक केली जात आहे. तर, अनेक ठिकाणाहून शस्त्र साठाही जप्त करण्यात येत आहे. अशातच सुरक्षा दलांनी मणिपूरच्या काही जिल्ह्यांमधून खंडणीच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना अटक केली आहे.
सुरक्षा दलांनी इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व आणि कांगपोक्पी जिल्ह्यांमध्ये कारवाई केली. या कारवाई दरम्यान, खंडणीच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लोइटांग खुलेन भागातून प्रतिबंधित केसीपी (पीडब्ल्यूजी) च्या एका सक्रिय सदस्याला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. तर, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील सगोलमांग बाजारातून प्रतिबंधित संघटना प्रेपाक (प्रो) च्या एका सदस्याला अटक करण्यात आली.
हेही वाचा..
राष्ट्रपती मुर्मूंनी पोर्तुगालच्या संसदेला दिली भेट
बघा रोजगाराच्या संधी कशा निर्माण होणार
रेपो दरात २५ आधार अंकांची कपात
मालेगावच्या मशिदीत मुस्लिम मौलवींनी काय भूमिका मांडली?
यापूर्वी भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने २६ मार्च ते २९ मार्च दरम्यान मणिपूरच्या कांगपोक्पी, तेंग्नौपाल, चंदेल, सेनापती, जिरीबाम आणि बिष्णुपूर जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत मोठे यश मिळवले होते. लष्कराच्या कारवाईत २९ शस्त्रे, सुधारित उपकरणे, ग्रेनेड, दारूगोळा आणि इतर युद्धाशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले होते. ही कारवाई मणिपूर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपी यांच्या समन्वयाने करण्यात आली होती.