तीन महिन्यांच्या मुलीला पुरणाऱ्या तृतीयपंथीयांना अटक

तीन महिन्यांच्या मुलीला पुरणाऱ्या तृतीयपंथीयांना अटक

मुलगी झाल्यामुळे बक्षीस मागण्यासाठी गेलेल्या तृतीयपंथीयांना हाकलून लावल्याच्या रागातून तृतीयपंथीयांनी ३ महिन्याचे मुलीचे अपहरण करून तिला समुद्रकिनारी असलेल्या वाळूत जिवंत पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना कुलाबा कफ परेड येथे शुक्रवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून दोन तृतीयपंथीयांना अटक केली आहे.

तन्नू (३०) आणि सोनू (२२) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही तृतीयपंथीयांचे नावे आहेत. हे दोघे कफपरेड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्याच परिसरातील विठ्ठलवाडी येथे राहणाऱ्या सचिन चिटकोट यांची ३ महिन्याची मुलगी आर्या हिचे गुरुवारी मध्यरात्री आईच्या कुशीतून अपहरण करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी कुशीत मुलगी दिसून आली नाही म्हणून चिटकोट कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला मात्र ती कुठेच न सापडल्याने अखेर कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरु केला होता.

हे ही वाचा:

‘शरद पवार हाजीर हो’…कोरेगाव भीमा प्रकरणात लवकरच नोंदवणार साक्ष

संजय राऊतांची मते वैयक्तिक स्वरूपाची…भाजपाने मला संपवायचा प्रश्नच नाही

अमितभाईंकडे काही गोष्टी गेल्या की, अनेकांना कापरे भरते

रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव

दरम्यान गुरुवारी दिवसभरात घरी कोण कोण आले होते व काय काय झाले याबाबतचा पोलिसांनी चिटकोट कुटुंबियांकडून आढावा घेतला. त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक तन्नू नावाचा तृतीयपंथ आला होता. मुलगी झाल्याचे बक्षीस म्हणून त्याने एक हजार एकशे रुपये आणि साडी नारळ मागितली होती, मात्र त्याला आम्ही काहीच न दिल्याने तो नाराज होऊन गेला, अशी माहिती चिटकोट कुटुंबीयांनी दिल्यानंतर पोलिसांनी तन्नू या तृतीयपंथीयाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली.

तन्नू आणि त्याचा मित्र सोनू असे दोघे चिटकोट कुटुंबियांना अद्दल घडविण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास आले. गर्मीमुळे चिटकोट कुटुंब दार उघडे करून झोपी गेले होते, त्यावेळी तन्नू आणि सोनू या दोघांनी आईच्या कुशीत झोपलेल्या ३ महिण्याच्या आर्याला उचलून थेट समुद्राजवळ आणले. त्या ठिकाणी वाळूत खड्डा करून आर्याला त्यात जिवंत गाडून निघून गेले, अशी माहिती ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांनी दिली.

पोलिसांनी दोघांना अटक करून घटनास्थळी दाखल झाले वाळूत पुरलेल्या आर्याला बाहेर काढून तिला डॉक्टरकडे आणण्यात आले असता डॉक्टरानी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालय येथे पाठवला असून या दोन्ही तृतीयपंथीयाविरुद्ध अपहरण, हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version