23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाआईकडून तिने घेतला सोनसाखळी चोरीचा वारसा

आईकडून तिने घेतला सोनसाखळी चोरीचा वारसा

मुंबईतर खास सणवार बघून चोरी करण्यासाठी आरोपी कर्नाटकातून यायची...

Google News Follow

Related

महामारी कोरोनाचा काळ लोटल्यावर मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी भव्य देखाव्यानंची आरास केली होती. हौशी मंडळी मोठ्या उत्साही आनंदी वातावरणात भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतात. देखावा बघण्यासाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातून भक्तजन येत असतात. हिच वेळ साधून चोरटे खास लोकल मधील गर्दीचा फायदा उचलत प्रवाशांच्या सोनसाखळीवर डल्ला मारामाऱ्या महिलेला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे.

मुस्कान शेख असं आरोपी महिलेचं नाव असून तिला चोरी करण्याचे प्रशिक्षण आईकडूनच मिळाली आहे. अशी माहिती तपासात उघड झाली आहे. ११ ऑगस्ट रोजी उल्हासनगर मधील गृहिणीकडून तक्रार करण्यात आली होती. ही महिला लोकलने अंबरनाथला रक्षाबंधनासाठी भावाकडे जात असताना एका अज्ञान महिलेने तिची सोनसाखळी चोरली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून शोध घेऊन आरोपी महिलेची ओळख पटवली.

आरोपी मुस्कान ही सहसा सणावारांच्या वेळी मुंबईत येऊन चोरी करत असे, अशी माहितीदारांनी माहिती पुरवली. जीआरपी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्शीद्दीन शेख यांनी आरोपी महिलेवर पाळत ठेवण्याची सूचना दिली होती. मुस्कान ही कर्नाटक जिल्यातील गुलबर्गा येथील जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसणार होती त्या अगोदरच पोलीस पथक कुर्ला स्थानकात पोहोचले आणि मुस्कानला ताब्यात घेतले. तिची झाडाझडती घेतली असता, तिच्या साडीत लपवलेल्या सोनसाखळ्या सापडल्या. त्यांची किंमत बाजारात २ लाख रुपये आहे.

हे ही वाचा:

“पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि आम्ही धनुष्यबाण जिंकू”

आज होणार राजपथचे कर्तव्यपथ

निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी

अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध

आरोपी मुस्कान शेख आई सोबत वयाच्या १४ व्या वर्षांपासून मुंबईत येत असल्याचे सांगितले. पोलीसांनी तिला कुर्ला स्थानकातून अटक केली असून, या अगोदर आणखी किती चोऱ्या केल्या आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा