31 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामाअजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!

अजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!

लखनऊमध्ये डॉक्टरच्या घरी घडली घटना

Google News Follow

Related

लखनऊमध्ये एक अजब घटना घडली. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक चोर घरात शिरला, सगळे दागिने एकत्र केले, किमती सामान बांधले एवढेच नव्हे तर वॉश बेसिनही चोरले पण नंतर त्याने जे केले त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला.

हा चोर नशेत होता. प्रचंड उकाड्यामुळे त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. पण त्या घरात एसी होता. चोराने थोडी विश्रांती घेण्याचे ठरवले आणि मऊ मऊ गादीवर पहुडला. पण अरे देवा, चक्क सकाळी पोलीस खोलीत पोहोचले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

लखनऊच्या इंदिरा नगर मध्ये तो चोर डॉक्टर सुनील पांडेय यांच्या घरात घुसला. घरात कुणीही नव्हते. त्याच्यासोबत आणखीही काही चोर होते. सगळ्यानी मग घरातील कपाटे फोडली, दागिने काढले, किमती सामान एकत्र केले, पंप घेतला, बेसिनही चोरले. बाकी चोर बाहेर पडले पण एक चोर नशेत असल्यामुळे तिथेच थांबला.

हे ही वाचा:

रविना टंडनला लोकांनी घेरले, तिच्या वाहनचालकाने धडक दिल्यामुळे झाला राडा!

नकली यूट्यूब पत्रकार रोज मोदी सरकारच्या नावाने खडे फोडतात

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याचा खून

अरुणाचल प्रदेशात भाजपचा तिसऱ्यांदा दणदणीत विजय

घरातला एसी पाहून तो एसी त्याने चालू केला आणि थंड हवा खात झोपी गेला. पण घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता. त्यामुळे घर मालकाने पोलिसांना बोलावले आणि त्यांना एसी लावून बेडवर झोपलेला चोर दिसला. पोलिसांनी त्याला गुडमॉर्निंग करत उठवले. आता तो जेलची हवा खात आहे.
सदर डॉक्टर हे वाराणसीत नोकरी करतात पण त्यांचे घर लखनऊत आहे.पोलिसांनी कपिल नावाच्या त्या चोराला पकडले असून त्याची चौकशी सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा