चोरीनंतर चोराने व्यक्त केला अनोख्या पद्धतीने पश्चात्ताप!

चोरीनंतर चोराने व्यक्त केला अनोख्या पद्धतीने पश्चात्ताप!

चोरी केल्यानंतर पोलिसांनी पकडल्यावर अनेकांना पश्चात्ताप होतो, पण नाशिकमधील एका चोराला चोरी केल्यानंतर लगेचच पश्चात्ताप झाला आणि त्याची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

नाशिकमध्ये या चोरट्याने जेलरोड परिसरात चोरी केली खरी पण ती केल्यावर त्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने एक चिठ्ठी या चोरीच्या सामानासोबत लिहून ठेवली आणि माल परत केला. ती चिठ्ठी वाचल्यावर चोराच्या मानसिक अवस्थेची कल्पना आली.

नाशिक, जेलरोडच्या विठ्ठलनगर येथील शरद साळवे यांच्या घरामध्ये हा चोर शिरला होता. शनिवारी त्याने साळवे यांच्या घरातून काही गोष्टी लंपास केल्या. त्यानंतर साळवे यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिस साळवे यांच्या घरी दाखल झाले आणि काय काय चोरी झाले, किती किमतीचा ऐवज लंपास झाला वगैरे तपास करू लागले. तेव्हा या चोराने घरात कुठून प्रवेश केला असेल याची पाहणी करताना त्यांना छतावर एक बॅग आढळली. ती बॅग पोलिसांनी हस्तगत केली आणि ती उघडून पाहिल्यावर त्यात एक चिठ्ठीही सापडली.

हे ही वाचा:

नीरज चोप्राच्या गौरवार्थ डाक विभागाची सोन्याची पत्रपेटी

हिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बाइकर्सने वाचवले प्राण

भायखळ्यात लाकडाच्या वखारीला भीषण आग

आजपासून यांना मिळणार बूस्टर डोस

 

त्या चिठ्ठीत चोराने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या वाचून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. चोराने म्हटले होते की, मी तुमच्या गल्लीतच राहतो. मीच तुमची बॅग चोरली आणि पत्र्यावर टाकली. मला पैशांची गरज होती पण मी हे पैसे घेऊन गेलेलो नाही. मी ते परत करत आहे. सॉरी, मला माफ करा.

या बॅगमध्ये सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र अशा वस्तू होत्या. चोराने चोरी करून नंतर तो माल परत करण्याचा आणि त्यासाठी माफी मागण्याचा हा पहिलाच प्रकार होता.

Exit mobile version