जिथे चोरी करायची तिथे चोरांचे बारीक लक्ष असते. याच मिळालेल्या थोड्याथोडक्या वेळेतही ते हातसफाई करू शकतात. अंधेरी लोखंडवाला भागात राहणारे विश्वास कुटुंबीय रात्री जेवणासाठी बाहेर पडले असताना २- ३ तीन तासाच्या अवधीमध्ये चोरांनी घरातील ११ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ह्या संबंधित घटनेमध्ये पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे.
अंधेरी लोखंडवाला येथील गुरुदर्शन टॉवरमध्ये चौथ्या मजल्यावर राहणारे विश्वास कुटुंबीय १० वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवणासाठी बाहेर पडले आणि फेरफटका मारून रात्री १ च्या सुमारास घरी परतले. त्यावेळी घरचा दरवाजा उघडला असता. घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त झालं होत. विश्वास कुटुंबीयांनी घरातील कपाट उघडून बघितले असता, कपाटामधून काही रोख रक्कम सह सोन्याचे, हिऱ्याचे दागिने, लॅपटॉप, आयफोन, घड्याळे असा एकूण ११ लाख १२ हजारांचा ऐवज चोरांनी गायब केला. तात्काळ विश्वास कुटुंबीयांनी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याला दिली. ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
हे ही वाचा:
तेजस्वी सूर्याने केला मोदींचा लाल चौकातील ‘तो’ फोटो शेअर
फ्लॅटचे आमिष दाखवून महिलेची ४७ लाख रुपयांची फसवणूक
पाचव्या मजल्यावरून चिमुरडी पडली! तिला कुणी झेलले?
खासदारांच्या घरांवर मोर्चे काढण्याचा अधिकार कुणी दिला ?
ओशिवरा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप पाटील यांच्या सह पोलीस पथक कामाला लागले. पथकाने अंधेरी लोखंडवाला परिसरातील खाजगी व सरकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बारकाईने तपासणी केली असता, संशयितांचे चेहरे दिसले. त्या आधारे पोलिसांनी खबरे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना दहिसर आणि बोरिवली येथून रोहित कोरडे, प्रीतेश मांजरेकर आणि रोहित हेगडे या तिघांना अटक केले आहे. विशेष म्हणजे ह्या चोरांकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.